
गायत्री नगरमध्ये घरफोडी; २ लाख ३७ हजारांचा ऐवज लंपास
गायत्री नगरमध्ये घरफोडी; २ लाख ३७ हजारांचा ऐवज लंपास
कुऱ्हा, ता. मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : कुऱ्हा ते मुक्ताईनगर रस्त्यावरील गायत्री नगर भागात बंद घराचे कडी-कोयंडे तोडून चोरट्यांनी २ लाख ३७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना ३१ मे ते १ जून दरम्यान घडली.
आनंद गोपाल शर्मा यांच्या गायत्री नगरमधील घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरूममधील कपाट उचकटून त्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये
११ ग्रॅम वजनाची ८८ हजार रुपये किमतीची सोन्याची मंगळपोत
७ ग्रॅमचा ५६ हजार रुपयांचा सोन्याचा तुकडा
६ ग्रॅमची ४८ हजारांची सोन्याची कर्णफुले
२० ग्रॅम वजनाची २० हजार रुपयांची चांदीची पैंजण
रोख २५ हजार रुपये
असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची माहिती आहे.
या प्रकरणी गणेश शर्मा यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम