
गावठी कट्टा विक्रीपूर्वीच एलसीबीने आरोपीला केले गजाआड
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
गावठी कट्टा विक्रीपूर्वीच एलसीबीने आरोपीला केले गजाआड
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जळगाव : चाळीसगाव येथे गावठी कट्टा विक्रीसाठी निघालेल्या मुद्दसीर नझर सलीम परवेझ शेख (रा. तांबापुरा, जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने सापळा रचून अटक केली.
शिरसोली रस्त्यावरील जकात नाका परिसरात उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली. मुद्दसीरच्या अंगझडतीत गावठी कट्टा, पाच जीवंत काडतुसे, तलवार व (एमएच ४७ बीयू ०३७७) क्रमांकाची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी त्याच्याविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत सफौ अतुल वंजारी, राजेश मेढे, हरिलाल पाटील, विजय पाटील आणि अक्रम शेख यांनी सहभाग घेतला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम