गावातील उर्वरित विकास कामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – पालकमंत्री गुलाबराव पाटील

पथराड खु. येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी ना. पाटील यांचे प्रतिपादन

बातमी शेअर करा...

गावातील उर्वरित विकास कामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – पालकमंत्री गुलाबराव पाटील

पथराड खु. येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी ना. पाटील यांचे प्रतिपादन

जळगाव l प्रतिनिधी

गावाच्या एकजुटीवर गावातील कोणते काम अशक्य नाही. शासनाच्या विविध योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवून, ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका सरपंच, सदस्यांनी ठेवून गावाची एकजूट कायम ठेवून

गावातील

एकोप्याने “गावाचा विकास ” साध्य करा. गावाची झालेली बिनविरोध निवडणूक ही गावाच्या एकीचे बळ आहे. गावातील उर्वरित विकास कामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही.

गावातील

गावातील

असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. ते पथराड खु. येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

या कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण
शेकडो ग्रामस्थांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे फटाक्यांच्या आतिशबाजीत व ढोल – ताश्यांच्या गजरात शाल श्रीफळ देऊन स्वागत केले.

गावातील

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पथराड ते मुसळी फाटा डांबरीकरण करणे ( 6 कोटी 15 लक्ष) रस्त्याचे भूमिपूजन तसेच गाव संरक्षण भिंत (18 लक्ष), गाव अंतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसविणे (12 लक्ष), स्मशानभूमी सुशोभीकरण (4 लक्ष), मुलभूत सुविधे अंतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसविणे (05 लक्ष), लोकार्पण विधिवत पूजा करून करण्यात आले.

नवनिर्वाचितांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला सत्कार
यावेळी पथराड खु. चे नवनिर्वाचित लोक नियुक्त सरपंच मंजुळाबाई श्रीकांत चव्हाण, उपसरपंच गजानन पाटील, बोरगाव बु. चे नवनिर्वाचित सरपंच उषाबाई मराठे यांचा शाल श्रीफळ देवून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

गावात व परिसरात भगवे झेंडे, मोठ – मोठे बॅनर व भगव्या पताका लावून परिसरातील वातावरण भगवामय झाले होते. कार्याक्रमचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख भैया मराठे यांनी केले. आभार श्रीकांत चव्हाण यांनी मानले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, माजी जिल्हा परिषद प्रतापराव पाटील, लोक नियुक्त सरपंच मंजुळाबाई श्रीकांत चव्हाण , उपसरपंच गजानन पाटील, बोरगाव बु. चे नवनिर्वाचित सरपंच उषाबाई मराठे,

ॲड. शरद पाटील, माजी सभापती प्रेमराज पाटील , मुकुंदराव नन्नवरे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष सचिन पवार, तालुका संघटक रविंद्र चव्हाण सर, दीपक भदाणे,

परिसरातील सरपंच कैलास सोनवणे, प्रवीण पाटील, कैलास पाटील, डॉ.उत्पल कुंवर, व परिसरातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम