सरपंचानी गाव विकासासाठी कार्य करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील
विकास कामांमुळे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शेळगाव सरपंचाचा शिवसेनेत प्रवेश !
सरपंचानी गाव विकासासाठी कार्य करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील
विकास कामांमुळे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शेळगाव सरपंचाचा शिवसेनेत प्रवेश !
पाळधी ता. जळगाव l प्रतिनिधी
शेळगाव येथील सरपंच संजय कोळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी गावो – गावी होत असलेल्या विकास कामांमुळे शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी सरपंच संजय रामचंद्र कोळी, उपसरपंच गणेश रुपसचंद पाटील, माजी सरपंच हरीश रुपचंद कोळी, सदस्य ज्ञानेश्वर तुकाराम कोळी व कौतीक भिला धनगर, यांचा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शिवसेनेच्या ध्येय धोरणानुसार काम करून सरपंच, उपसरपंच यांनी गाव विकासासाठी तत्पर राहून कार्य करावे. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीनंतर जळगाव व धरणगाव तालुक्यात शिवसेनेत जोरदार इन कमिंग सुरु झाले आहे.
यावेळी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे, माजी उपसरपंच युवराज कोळी, शिवसेना तालुका संघटक रवींद्र चव्हाण, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, सरपंच संघटनेचे सचिन पवार, युवासेनेचे तालुका प्रमुख आबा माळी, आदी मान्यवर उपस्थित होते.
नंदगाव येथे पाण्याच्या टाकीचे प्रतापराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन !
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम