
गुलियन बॅरी सिंड्रोम आजाराने तरुणाचा मृत्यू
पुण्यातील घटना
पुणे वृत्तसंस्था
पुण्यामध्ये गुलियन बॅरी सिंड्रोम या आजारामुळे एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. पुण्यात राहणाऱ्या सोलापूरच्या एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मूळचा सोलापूर जिल्ह्यातील असणाऱ्या एका तरुणाला गुलियन बॅरी सिंड्रोम या आजारामुळे जीव गमवावा लागला आहे. हा तरुण पुण्यातील धायरी परिसरात असणाऱ्या डीएसके विश्व या ठिकाणी राहत होता. या तरुणाला काही दिवसांपूर्वी गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराची लागण झाली होती. यानंतर तो सोलापूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होता व या आजारातून सावरला होता.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम