गो. से. महाविद्यालयाचा शिवम खराटे राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेत तिसरा

बातमी शेअर करा...

गो. से. महाविद्यालयाचा शिवम खराटे राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेत तिसरा

 सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम प्रदान 

खामगाव:प्रतिनिधी 

 

विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव द्वारे संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयाचा बी.एस.सी. भाग १ प्राणीशास्त्रचा विद्यार्थी शिवम खराटे याने श्री वेंकटेश महाविद्यालय, देऊळगाव राजा येथे आयोजित राज्यस्तरीय पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक मिळवून महाविद्यालयाचे नावलौकिक केले आहे. ‘द सिग्निफिकँस ऑफ सायन्स इन सोसायटी अँड इट्स कॉन्ट्रीब्युशन टू प्रोग्रेस’ या विषयावर मंगळवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित राज्यातील विविध महाविद्यालयातून सुमारे ४२ स्पर्धकांनी आपले नाव नोंदविले होते.

 

त्यामध्ये वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, भौतिकशास्त्र, संगणकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र अशा अनेक विषयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. गो. से. महाविद्यालय, खामगाव येथील बी.एससी. भाग २ मधील प्रिया चव्हाण, गौरी राजपूत आणि बी.एस.सी. भाग १ चा शिवम खराटे या तीन विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. शिवम खराटे याने ‘CRISPR Cas-9 टेक्नॉलॉजी’,  या विषयावर पोस्टर तयार केले होते आणि त्याने परीक्षकांच्या प्रश्नांना विस्तृतपणे  स्पष्टीकरण दिले

 

. या विषयात त्याला तिसरे बक्षीस मिळाले. सोबतच सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम रु.७००, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र मिळविले आहे. त्याकरिता त्याचे विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुभाषराव बोबडे, सचिव डॉ. प्रशांत बोबडे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर, प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ जी. बी. काळे यांनी अभिनंदन केले

 

. सदर स्पर्धेकरिता प्रणिशास्त्र विभागाचे प्रा. मनोज बाभळे यांनी मोलाचे मार्गदर्शन करीत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. तसेच प्राणीशास्त्र विभागाचे सर्व प्राध्यापक सुहास पिढेकर, सचिन खंडारे, तृप्ती पारस्कर, डॉ. दिपाली धरमकर, ज्योती शर्मा, अनिकेत वानखेडे, कर्मचारी माणिक थाटे , प्रसाद खानोरे यांनी  शिवमच्या यशाबद्दल अभिनंदन व कौतुक केले. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागिब देशमुख यांनी दिली आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम