कजगाव येथील रघूनाथ जाधव सेवानिवृत्त

रघुनाथ जाधव सेवानिवृत्त कजगाव ता भडगाव येथील ग्रापंचायत मधील वरिष्ठ क्लर्क रघुनाथ जयराम जाधव हे ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ग्रापंचायत सेवेतून सेवा निवृत्त झाले आपल्या प्रदीर्घ सेवेत असतांना त्यांनी ग्रामस्थांची कामे मोठ्या उत्साहाने व प्रामाणिकपणे पार पाडली सेवानिवृत्ती बद्दल त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार कजगावच्या लोकनियुक्त सरपंच वैशाली पाटील व माजी शिक्षण सभापती एकनाथ महाजन यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपसरपंच खुशाल भोई ग्रा प सदस्य मनोज धाडीवाल अनिल टेलर पुंडलिक सोनवणे मुमताजबी तांबोळी ग्रामविकास अधिकारी एस एन महाजन सरपंच पती दिनेश पाटील माजी ग्रापंचायत सदस्य अनिल महाजन रवींद्र पवार प्रमोद ललवाणी मंसाराम महाजन कैलास महाजन निंबा महाजन संजय महाजन ग्रा प क्लर्क सुनील पाटील ग्रा प कर्मचारी रवींद्र मालचे संजय पाटील जाकीर मणियार मनोज सोनवणे संजय पाटील लुकमान मणियार देविदास पाटील व असंख्य ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम