ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी १६ जानेवारीपासून बेमुदत धरणे तर २१ ला जेल भरो चा इशारा.!!
बातमीदार | दि ९ जानेवारी २०२४
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी १६ जानेवारीपासून बेमुदत धरणे तर २१ ला जेल भरो चा इशारा.!!
चोपडा – महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी एल्गार पुकारलेला आहे.
त्यात येत्या १६ जानेवारीपासून २१ जानेवारी पर्यंत ना. गिरीश महाजन यांच्या जळगाव येथील संपर्क कार्यालय जवळ बेमुदत धरणे व जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे.
असा इशारा जिल्हा महासंघाने जाहीर केलेल्या पत्रकात दिलाआहे यासाठी विविध जिल्ह्यातून कर्मचारी १६ ते 21 जानेवारी काळात जळगाव जिल्ह्यात धडकणार आहेत.
तसेच सहाव्या दिवशी म्हणजे २१ जानेवारी रोजी जळगाव येथे प्रचंड जेल भरो आंदोलन केले जाणार आहे. आंदोलनाचे नेतृत्व ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे नेते कॉ तानाजी ठोंबरे, मिलिंद कुमार, गणवीर, कॉ नामदेवराव चव्हाण हे करणार आहेत.
अशी माहिती.जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे पत्रकात देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर असे की, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अभय यावलकर समितीच्या शिफारशी लागू करा .
१० ऑगस्ट २०२० रोजी मान्य केलेले किमान वेतन २०१८ पासून लागू करून त्याप्रमाणे फरक बिलाची ५१ महिन्याची थकबाकी द्या, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी उत्पन्न वसुलीची जास्त अट रद्द करा, लोकसंख्येची जाचक अट व आकृतीबंध रद्द करून आकृती बंध बाहेरील कर्मचाऱ्यांना सुद्धा किमान वेतन व दहा टक्के आरक्षणाचा लाभ द्या, दहा टक्के आरक्षणाप्रमाणे प्रत्येक वर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या आधारावर भरती प्रक्रिया गतिमान करा.
सामाजिक न्याय देण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करा. अनुकंपाप्रमाणे दहा टक्के आरक्षणाच्या भरतीसाठी दरवर्षी कार्यवाही करा, शासनमान्य राहणीमान भत्ता शंभर टक्के शासनाच्या तिजोरीतून मीळावा, ग्रॅच्युटी अर्थात उपदानाचे निकष बदलून दहा कर्मचारी आणि पन्नास हजार रुपये मिळण्याची अट रद्द करा,
भविष्य निर्वाह निधीची खाती अद्यावत करा, कपातीच्या रकमच्या पावत्या व पासबुक द्या, किमान वेतनाची मुदत फेब्रुवारी २०२३ ला संपली असल्यामुळे नवीन सुधारित किमान वेतनासाठी समिती गठन करा या मागण्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करीत आहोत. परंतु ग्रामीण विकास मंत्री या कर्मचाऱ्यांचा प्रश्नी बेफिकीर आहेत.
त्यामुळे नाईलाजाने ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने नामदार गिरीश महाजन यांच्या कार्यालयासमोर आंदोलनाचा निर्धार व्यक्त केलेला आहे. त्यात दि.१६ जानेवारी पासून जळगाव, नाशिक व धुळे जिल्ह्यातील प्रतिनिधी आंदोलन करणार असून १७ जानेवारी रोजी पुन्हा जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्हे सहभागी होणार आहेत.
अशा तऱ्हेने ५ दिवस पर्यंत आंदोलन सुरूच राहणार असून २१ जानेवारी रोजी प्रचंड जेलभरो आंदोलन केले जाणार आहे. असा इशारा महासंघाने महाराष्ट्र शासनाला दिलेला असून, त्या दृष्टीने जोरदार तयारी चालू आहे.
या आंदोलनाला जिल्ह्यातून १००० कामगार २ दिवस सहभागी होणार आहेत, अशी माहिती जिल्ह्याचे ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे राज्यसचिव कॉ अमृत महाजन,
जिल्हा अध्यक्ष संतोष खरे, सचिव राजेंद्र खर, उपाध्यक्ष किशोर कंडारे, अशोक जाधव, अशोक गायकवाड, शिवशंकर महाजन, संजय कंडारे, प्रदीप जोशी, राजेंद्र कोळी व आदींनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम