ग्रामसेवक लाच प्रकरण: सरपंचासह चौकशीला वेग

ग्रामपंचायत कामांची चौकशी सुरू

बातमी शेअर करा...

ग्रामसेवक लाच प्रकरण: सरपंचासह चौकशीला वेग

ग्रामपंचायत कामांची चौकशी सुरू

जळगाव प्रतिनिधी

धरणगाव तालुक्यातील खदें बुद्रुक गावात ग्रामपंचायतीच्या विकासकामांमध्ये लाचखोरीचा प्रकार उघड झाला असून, ग्रामसेवकासह सरपंचाचीही चौकशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गावातील काँक्रीट गटारी आणि गावहाळ बांधकामाचे धनादेश काढून देण्यासाठी ग्रामसेवक नितीन भीमराव ब्राम्हणे यांनी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले.

लाचखोरी प्रकरणातील संभाषणात, “सरपंचालाही २० टक्के मिळतात आणि तुम्हाला दहा टक्के जड जात आहेत?” असे बोलल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सरपंचाचाही यात सहभाग असू शकतो असा संशय व्यक्त होत असून, त्यांचीही चौकशी होणार आहे.

 

लाचखोरीप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर ग्रामसेवक ब्राम्हणे यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड. रमाकांत सोनवणे यांनी कामकाज पाहिले.
गावातील विकासकामांसाठी घेतली जाणारी लाचेची टक्केवारी आणि यामध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. ग्रामसेवकाने यापूर्वीही अशाच प्रकारे कोणाकडून पैसे घेतले आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.

लाच स्वीकारण्याआधी ग्रामसेवकाने तक्रारदाराच्या मित्राला फोन करून लाचेची व्यवस्था करण्यास सांगितल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम