घरफोडी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोन संशयितांना अटक

एमआयडीसी पोलिसां कारवाई

बातमी शेअर करा...

बातमीदार l गुरुवार दि. २९ फेब्रुवारी २०२४

जळगाव ;- घरफोडी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोन संशयितांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवार रात्री करण्यात आली असून दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील कस्तुरी हॉटेजवळ मंगळवार दि. २७ रोजी रात्रीच्या सुमारास महेश संतोष भोई (वय २०, रा. रामेश्वर कॉलनी) हा चोरी करण्याच्या उद्देशाने फिरताना आढळून आला होता. तसेच मेहरुण स्मशानभूमीजवळ राजेश माणिकराव राठोड (वय २३, तांबापुरा) हा देखील चोरी आणि घरफोडीच्या उद्देशाने चेहरा झाकून संशयास्पदरित्या फिरताना रात्री आढळला होता. या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, सचिन पाटील, विकास सातदिवे, सुधीर साळवे, गणेश शिरसाळे, ललित नारखेडे, आकाश राजपूत, ईश्वर भालेराव यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम