घर खाली करण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात हाणामारी

भुसावळ येथील घटना

बातमी शेअर करा...

घर खाली करण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात हाणामारी
भुसावळ येथील घटना

भुसावळ I प्रतिनिधी
घर खाली करून देण्याचा कारणावरून दोन कुटुंबाबत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना १८ जानेवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे बाजारपेठ पोलीस होण्यात दाखल करण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भुसावळ शहरातील शिवाजी नगरात अनिल हरगोविंद सिंधवाणी वय-६० आणि प्रविण अशोक अग्रवाल वय ३४ असे दोन कुटुंबिय राहतात . दोघांच्या कुटुंबात शनिवारी १८ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घर खाली करण्यावरून वाद उफाळून आला . याचे पर्यावसन हाणामारीत झाले. . यात पहिल्या कुटुंबातील अनिल सिंधवाणी यांच्यासह शृती हरगोविंद्र सिंधवाणी आणि क्रीश अनिल सिंधवाणी यांना मारहाण करून जखमी करत त्यांच्या घरातून ३ लाख ४० हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. . दुसर्या घटनेत प्रविण अग्रवाल यांच्यासह अशोक अग्रवाल,शोभा अग्रवाल, आरती अग्रवाल, कैलास अग्रवाल आणि सोनी अग्रवाल सर्व रा. शिवाजी नगर, भुसावळ यांना चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून घराचे कुलूप तोडून घरातून सोन्याचे मंगळसुत्र आणि रोकड असा एकुण २ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जबरी चोरून नेले असल्याची फिर्याद दिली .

याबाबत ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे हे करीत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम