घोडगाव परिसरातील गावात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

अनेर परिसरातील नागरिकांचा भरघोस सहभाग

बातमी शेअर करा...

घोडगाव परिसरातील गावात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

अनेर परिसरातील नागरिकांचा भरघोस सहभाग

घोडगाव ता. चोपडा । प्रतिनिधी

नामदार गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन पाळधी, संकल्प सेवा फाउंडेशन धनवाडी आणि आर. झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल (नवी मुंबई)

यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

घोडगाव
घोडगाव

प्रेरणास्थान व आधारस्तंभ कार्यसम्राट आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि. 4 जानेवारी रोजी या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

अनेर परिसरातील वेळोदे, घोडगाव, कुसुंबे, वढोदा आणि वाळकी या गावांतील शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

या शिबिरात मोतीबिंदूसाठी तपासणी झालेल्या ४६ रुग्णांना ऑपरेशनसाठी पनवेल (नवी मुंबई) येथे पाठविण्यात आले.

नेत्र तपासणीसाठी आलेल्या नागरिकांना शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला व उपचार मिळाले.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुनील भाऊ कोळी, मुकेश कोळी, गोपाल भोई, अक्षय पारधी, किरण भोई, डॉ. बी.आर. पाटील, नितीन जैन,

डॉ. कोळी दादा, अशोक पवार (वेळोदे), भूपेंद्र वाघ, जयेश भोई, डॉ. राहुल चौधरी आणि डॉ. राहुल पाटील यांची टीम व सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

या शिबिरामुळे अनेकांना मोतीबिंदू व नेत्ररोगांपासून दिलासा मिळाला असून नागरिकांनी आयोजकांचे कौतुक केले आहे.

हे ही वाचा👇

लासूर येथे आमदार चंद्रकांत सोनवणे यांचा नागरी सत्कार सोहळा

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम