
चाळीसगांवात वीज चोरांविरुध्द धडक कारवाई
११९ मीटरमध्ये फेरफार केल्याचे उघडकीस
चाळीसगांवात वीज चोरांविरुध्द धडक कारवाई
११९ मीटरमध्ये फेरफार केल्याचे उघडकीस
जळगाव I प्रतिनिधी
चाळीसगांव विभागांतर्गत 17 जानेवारी 2025 रोजी कार्यकारी संचालक श्री.धनंजय औंढेकर मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी, जळगावचे अधिक्षक अभियंता अनिल महाजन, चाळीसगांव विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन घुमरे व अति.कार्यकारी अभियंता . रवींद्र जाधव यांच्या उपस्थितीमध्ये महावितरणच्या चाळीसगांव विभागाच्या पथकाने शुक्रवारी चाळीसगांवात दिवसभर वीज ग्राहकांच्या घरांची मीटर तपासणी केली. यावेळी 119 वीजग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळल्यानंतर त्यांचे मीटर जप्त करण्यात आली असून महावितरण कंपनीच्या नियमाप्रमाणे दंडात्मक कारवाई सुरु आहे.
पथकाने चाळीसगांव शहरातील व ग्रामीण भागातील ग्राहकांच्या घरांची मीटर तपासणी केली. यात सुमारे 799 वीजमीटरची तपासणी केली. यावेळी 119 ग्राहकांच्या मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी होत असल्याचे निदर्शनास आले . यामुळे मीटरची गती कमी होऊन, ग्राहकांना वीज बिल कमी येते. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी हे मीटर जप्त केले असून, त्यांच्यावर दंडाची कारवाई सुरू केली आहे. दंड नाही भरला तर गुन्हा दाखल केला जाणार आहे. चाळीसगांवात आता महावितरणतर्फे ही कारवाई यापुढेही सुरु राहणार आहे. त्यामुळे ज्या वीज ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार केला असेल, त्यांनी स्वतः हून कंपनीकडे ती वीज मीटर जमा करावे, असे आवाहन चाळीसगांव विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. नितीन घुमरे यांनी केले आहे.सदर मोहिमेमध्ये जळगाव मंडळामधील विभागीय स्तरावरील पथकांनी सहभाग घेतला तसेच उपविभागीय अभियंता श्री. रुपेश आळतेकर , श्री. योगेश पांडे, श्री. जयेश सूर्यवंशी, व श्री. प्रवीण विधाते व त्यांच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांनीही वीजचोरी मोहीममध्ये योगदान दिले .

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम