
चोपडा तंत्रनिकेतन महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
बाबासाहेबांच्या संविधान निर्मितीतील मोलाच्या योगदानाचा आढावा
चोपडा तंत्रनिकेतन महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
बाबासाहेबांच्या संविधान निर्मितीतील मोलाच्या योगदानाचा आढावा
चोपडा | प्रतिनिधी
महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक), चोपडा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी उत्साहात व सन्मानपूर्वक साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर प्राचार्य प्रा. व्ही. एन. बोरसे यांनी बाबासाहेबांच्या संविधान निर्मितीतील मोलाच्या योगदानाचा आढावा घेतला. त्यांच्या सामाजिक समतेच्या दृष्टीकोनावर प्रकाश टाकत त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
“भाकर जगण्यासाठी आणि पुस्तक जगणं शिकवण्यासाठी…”
प्राचार्य बोरसे म्हणाले, “जर तुमच्याकडे दोन रुपये असतील, तर एक रुपयाची भाकरी आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या, कारण भाकर तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल,” या बाबासाहेबांच्या विचारांचे आजही तितकेच महत्त्व आहे.
कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांनी बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करत सामाजिक समतेची शपथ घेतली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम