चोपडा येथे गुर्जर समाजातर्फे आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस साजरा होणार

बातमी शेअर करा...

चोपडा येथे गुर्जर समाजातर्फे आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस साजरा होणार

चोपडा (प्रतिनिधी) : गुर्जर प्रतिहार महान सम्राट मिहीरभोज यांच्या जयंतीनिमित्त येत्या २६ ऑगस्ट २०२५, मंगळवार रोजी चोपडा शहरात आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून समाजबांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे आयोजन बोरोले नगर-१ येथील ब्रिलियंट क्लासेसच्या हॉलमध्ये सकाळी ९.३० वाजता करण्यात आले आहे. या दिवशी “गुर्जर एकता जिंदाबाद, हर हर भोज – घर घर भोज” या घोषणांनी वातावरण गुंजून जाणार असून समाज एकतेचा संदेश दिला जाणार आहे.

या उपक्रमासाठी चोपडा शहर व तालुक्यातील सर्व गुर्जर बंधू-भगिनींनी एकत्र येऊन सहभाग नोंदवावा, असे आवाहन गुर्जर समाजतर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती राहील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम