चोपडा विधानसभा मतदारसंघात १० कोटींच्या कामांचा श्रीगणेशा

चोपडा विधानसभा मतदारसंघात आमदार निधीतून मंजुर झालेल्या विविध विकास कामांचा भुमिपुजन सोहळा

बातमी शेअर करा...

  बातमीदार | दि ५ जानेवारी २०२४

     चोपडा विधानसभा मतदारसंघात १० कोटींच्या कामांचा श्रीगणेशा

      चोपडा विधानसभा मतदारसंघात आमदार निधीतून मंजुर झालेल्या विविध विकास कामांचा भुमिपुजन सोहळा

         दि.६ व ७ जानेवारी २०२४ रोजी आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते व माजी आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.

या दोन दिवसात १० कोटी रुपयांच्या कामांचा श्रीगणेशा होत असल्याने परिसरातील जनतेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दि ६ जानेवारी रोजी ५ कोटी ६६ लाख रुपये किंमतीच्या विकास कामांचा शुभारंभ
कृष्णापुर ते मामलदे गावापर्यंत ५ किमी रस्त्याचे डांबरीकरण करणे.रु.१.६५ कोटी रु. (एक कोटी पासष्ट लाख रु.),
मामलदे गावातील ४५० मी. लांबी काँक्रीटीकरण करणे रु.१.१० कोटी रु. (एक कोटी दहा लाख रुपये),
चौगांव येथे ४३५ मी. रस्ता गटारीसह ट्रिमीक्स काँक्रीटीकरण करणे रु.१.१४ कोटी रु. (एक कोटी चौदा लाख रुपये)
गणपूर ते लासुर ७०० मी. रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे रु.२५.०० लक्ष (पंचवीस लाख रुपये),

हे पहा

 लासुर येथे २ अंगणवाडी खोल्यांचे बांधकाम करणे रु.२२.३० लक्ष (बावीस लाख तीस हजार रुपये) असा एकूण ५ कोटी ६६ लाख रुपये किंमतीच्या विकास कामांचे भूमिपूजन होत आहे.

दि ७ रोजी या कामांचा फुटणार नारळ
कुसुंबा ते अजंतीसीम १० किमी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.३.०० कोटी रुपये (तीन कोटी रु.)

      वढोदा येथे पाणीपुरवठा योजना करणे.१.२८ कोटी रुपये (एक कोटी अठ्ठावीस लाख रु.)

मोहिदा येथे पाणी पुरवठा योजना करणे.५१.०० लक्ष रु. (एक्कावन लाख रु.),

अजंतीसीम येथे पाणी पुरवठा योजना करणे ३९.०० लक्ष रु. (एकोणचाळीस लाख रु.), विटनेर येथे पाणी पुरवठा योजना करणे

४८.०० लक्ष रु. (अट्ठेचाळीस लाख रु) असा एकूण ४ कोटी ३६ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या कामांचा शुभारंभ होत आहे.

तरी सर्व शिवसैनिक, पदाधिकारी व जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

हे वाचा

पिंप्राळा उड्डाण पुलाला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे यासाठी ना. रामदास आठवले यांना निवेदन

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम