चोपडा विधानसभा महायुतीचे उमेदवार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना तडवी भिल्ल आदिवासी समाजाकडून जाहीर पाठिंबा
विकास कामांवर खुश होत आदिवासी व अल्पसंख्यांक बहुजन समाज अण्णांच्या पाठीशी खंबीरपणे उभा
चोपडा विधानसभा महायुतीचे उमेदवार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना तडवी भिल्ल आदिवासी समाजाकडून जाहीर पाठिंबा
विकास कामांवर खुश होत आदिवासी व अल्पसंख्यांक बहुजन समाज अण्णांच्या पाठीशी खंबीरपणे उभा
चोपडा । प्रतिनिधी
चोपडा विधानसभा मतदार संघाचे भाजप, शिवसेना, रिपाई (आठवले गट) महायुतीचे उमेदवार माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना आदिवासी परिसरात वाढता पाठिंबा मिळत आहे.
गेल्या दहा वर्षाच्या कालखंडात माजी आम दार प्रा. चंद्रकांत सोनवणे आणि आमदार सौ. लताताई सोनवणे यांनी भरीव कामगिरी केलेली आहे.
त्यांच्या कार्यकाळात विकास कामे गाव खेड्यात पोहोचली आहेत म्हणूनच आदिवासी व अल्पसंख्यांक बहुजन समाज अण्णांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे परिसरातून बोलले जात आहे.
अण्णांनी विधानसभा क्षेत्रात जे ऐतिहासिक कामे केलेले आहेत त्यामुळे चोपडा व यावल तालुक्यात त्यांची विकास पुरुष म्हणून ओळख निर्माण झालेली आहे.
त्यांची भरीव कामगिरी पाहून विधानसभा मतदार संघातुन त्यांचा विजय नक्कीच आहे. परिसरात त्यांना भरीव प्रतिसाद मिळत आहे.
अण्णांनी केव्हाच जाती पातिचे राजकारण केलेले नाही. सर्व सामान्य लोकांना सोबत घेऊन प्रत्येक गावा गावात पाडे वाड्या वस्त्यात आणि डोंगरी भागात जाऊन विकास कामे केलेले आहेत, असे चित्र गावोगावी प्रचार दरम्यान पाहायला मिळत आहे.
हे ही वाचा👇
भाजपा निरीक्षकांची आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यासोबत भेट; प्रचाराची रणनीती ठरली
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम