
चोपड्यात अमरसंसथेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची ज्येष्ठ नागरिक संघास सदिच्छा भेट
चोपड्यात अमरसंसथेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची ज्येष्ठ नागरिक संघास सदिच्छा भेट
चोपडा : अमरसंसथेचे अध्यक्ष चंद्रकांत गुलाबराव पाटील यांनी चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाला सदिच्छा भेट देऊन ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतला. या भेटीदरम्यान संघाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
चंद्रकांत पाटील यांच्या अमरसंसथेच्या माध्यमातून गोशाळा, माध्यमिक विद्यालय, ज्युनिअर कॉलेज, वृद्धाश्रम, अनाथ बालकाश्रम, मानवसेवा यांसारखे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. समाजाभिमुख आणि शैक्षणिक कामकाजामुळे संस्थेने चोपडा तालुक्यात विशेष ओळख निर्माण केली आहे.
यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत पाटील यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. समाजातील विविध घटकांसाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती ऐकून ज्येष्ठांनी समाधान व्यक्त केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या सदिच्छा भेटीदरम्यान संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी पाटील यांनी ज्येष्ठांना आरोग्यदायी व आनंदी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम