
चोपड्यात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विविध कार्यक्रम
चोपड्यात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विविध कार्यक्रम
चोपडा प्रतिनिधी ;- ‘१ ऑक्टोबर’ हा दिवस जगभर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने दुहेरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी व्ही. एच. करोडपती (अध्यक्ष – फेस्कॉम पश्चिम खान्देश) उपस्थित होते. कार्यक्रम बुधवार दि. १ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता ज्येष्ठ नागरिक संघ भवन, चोपडा येथे पार पडला आहे.

कार्यक्रमांतर्गत ‘हृदयरोग : काळजी व शंका समाधान’ या विषयावर डॉ. सचिन एम. काटे (हृदयरोग तज्ज्ञ, साईबाबा हॉस्पिटल, चोपडा) यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच वृद्धाश्रमाद्वारे ज्येष्ठांची सेवा व विविध उपक्रम राबवणाऱ्या अमर संस्था, चोपडा चा गौरव करून अध्यक्ष चंद्रकांत गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला . .
चोपडा ज्येष्ठ नागरिक संघात १आक्टोबर जागतिकदिन २०२५ रोजी सकाळी ९.३०वाजता साजरा वरील पत्रातील मजकूर प्रमाणे साजरा करण्यांत आला.तसेच जेष्ठ नागरिक सदस्य संजय बजाज यांचा वाढदिवस निमित्ताने त्यांचेकडून वेले येथिल मानव सेवा तिर्थ येथील सहारा नसलेल्यांना भोजनाचा कार्यक्रम जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष जयदेव देशमुख व श्री.डोंगरे यांचे हस्ते करण्यात आले.
तसेच संजय बजाज यांचा वाढदिवस वैयक्तिक सत्कार जयदेव देशमुख यांनी केला व वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जेष्ठ पदाधिकारी उपाध्यक्ष नेरपगारे आबा दिलीपराव नानासाहेब,विलास पं. पाटील,.मधूकर आबा,शिंदे तात्या, प्रा.श्यामभाई गुजराथी,श्री.एम डब्लू पाटील सर प्रा.शिवाजी पाटील,प्रा..शिशोदे सर,प्रा.एस,एम, पाटील सर .डि.आर.परदेशी दादा,.एन.डी.महाजनसर,सुभाष गुरुजी ,प्रकाश चौधरी,बारी सर, राजेन्द्र साळूंके,शांताराम पाटील, गोकुळ पाटील साहेब, श्री पेंढारकर,रामकृष्ण माळी.शांताराम लोहार , इ.हजर होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम