चोरीचे सत्र थांबता थांबत नसल्याचे चित्र दिसून येत आहे

कजगाव ता भडगाव येथे चोरीचे सत्र सुरूच असून चोरीचे सत्र थांबता थांबत नसल्याचे चित्र दिसून येते आता पुन्हा एकदा चोरट्यांनी धाडस करून तब्बल आठ लाख रुपये कीमतीचे जनरेटर चोरून नेण्याचा प्रयत्न केला मात्र पहारेकरी ला अचानक जाग आल्याने त्यांनी आरडाओरड केली व चोरटे तेथून फरार झाले सदरील चोरीच्या घटनेमुळे गावात एकच चर्चेला उधाण आले आहे अलिकडच्या काही दिवसांपासून गावात विविध ठिकाणांना चोरट्यांनी टार्गेट केल्याचे दिसून येत आहे महादेव मंदिर,ऋषीबाबा मंदिर कालिका माता मंदिरावर चोरट्यांनी हात साफ केल्याचे आढळून आले आहे त्यातच कनाशी रस्त्यावरून काही दिवसांपूर्वी बैल जोडी चोरी झाल्याची घटना घडली होती तर त्याच रस्त्यावर तीन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या शेतातील अडीच लाख रुपये किमतीची ताडपत्री चोरीला गेली होती विशेष म्हणजे त्याच कनाशी रस्त्याजवळील कजगाव पारोळा रस्त्यावर सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामावरील जनरेटर चोरीचा प्रयत्न फसला आहे पाहरेकरीला वेळीच जाग आल्याने पोलिसांनी मोठ्या शिताफीने भामट्यांचा पाठलाग केला मात्र भामट्यांनी ट्रक्टर रस्त्यावरच सोडुन पोलिसांच्या तावडीतून पडून जाण्यात यशस्वी झाले दहा दिवसातील ही कनाशी रस्त्यावरील तिसरी घटना असल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे """:चोरीच्या ट्रक्टरनेच चोरीचा प्रयत्न प्राप्त माहिती नुसार जनरेटर चोरीसाठी वापरलेले ट्रॅक्टर यापूर्वी चोरी झाल्याचे कळत आहे सदरील ट्रॅक्टर हे दिनांक २० मे रोजी चाळीसगाव जवळून चोरीला गेले आहे तश्या पद्धतीची फिर्यात ट्रक्टर मालकाने जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिल्याचे कळते मात्र चोरीच्या ट्रक्टरनेच पुन्हा चोरीचा प्रयत्न केल्याने सामान्य नागरिकांच्या चांगल्याच भुवया उंचावल्या आहेत चोरीचा प्रयत्न पोलिसांच्या व पाहरेकरीच्यामुळे फसल्याने व पोलिसांनी पळून जाणाऱ्या ट्रक्टरचा पाठलाग केल्याने चोरटे अंधाऱ्याचा फायदा घेऊन पडून जाण्यास यशस्वी ठरले यावेळी पोलीस नाईक नरेंद्र विसपुते हवालदार राजू सोनवणे पोलीस गाडी वाहन चालक संभाजी पाटील ग्रामसुरुक्षा दलाचे योगेश चौधरी प्रवीण महाजन पहारेकरी रावसाहेब महाजन यांनी चोरट्यांना पाठलाग केला होता प्रतिक्रिया घटनेची माहिती कळताच मी व आमचे सहकारी पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहचवून ट्रक्टर चा पाठलाग केला मात्र अंधाऱ्याचा फायदा घेऊन चोरटे ट्रक्टर रस्त्यावर सोडून पडून गेले आहेत तसेच चोरीसाठी वापरलेले ट्रक्टर आम्ही जमा केले आहे नरेंद्र विसपुते पोलीस नाईक कजगाव पोलीस मदत केंद्र

advt office
बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम