छत्तीसगडच्या जंगलात मोठी चकमक : २७ नक्षलवादी ठार, एक जवान शहीद

बातमी शेअर करा...

छत्तीसगडच्या जंगलात मोठी चकमक : २७ नक्षलवादी ठार, एक जवान शहीद

अबुझमाड परिसरात ‘ट्राय-जंक्शन’ ऑपरेशन; करोडोचे बक्षीस असलेला बसवा राजू ठार

गडचिरोली : छत्तीसगडमधील दंतेवाडा, नारायणपूर व बिजापूर जिल्ह्यांच्या सीमावर्ती अबुझमाड जंगलात बुधवारी (२१ मे) सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या कारवाईत २७ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, एक पोलीस जवान शहीद झाला आहे. ठार झालेल्यांमध्ये नक्षल चळवळीचा मुख्य नेतेपद सांभाळणारा आणि १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेला ‘पॉलिट ब्युरो’ सदस्य बसवा राजू याचाही समावेश आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

गुप्त माहितीच्या आधारे २० मे रोजी रात्रीपासून अबुझमाड परिसरात व्यापक नक्षलविरोधी मोहीम सुरू करण्यात आली होती. या मोहिमेत दंतेवाडा, बिजापूर, नारायणपूर आणि कोंडागाव जिल्ह्यांतील ५०० हून अधिक डीआरजी (District Reserve Guard) व इतर सुरक्षा दलांचे जवान सहभागी झाले होते. बुधवारी सकाळी जंगलात सर्च ऑपरेशन सुरू असताना नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला.

सुरक्षा दलांनी तत्काळ प्रत्युत्तर देत जोरदार कारवाई केली. काही तास चाललेल्या या चकमकीत २७ नक्षलवादी ठार झाले, तर एक जवान देशासाठी शहीद झाला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा, साहित्य व अन्य नक्षलसाहित्य जप्त करण्यात आले आहे.

या कारवाईत बसवा राजूचा मृत्यू ही नक्षल चळवळीसाठी मोठी धक्का मानली जात आहे. तो अनेक राज्यांतील हिंसक घटनांचा मास्टरमाइंड होता आणि त्याच्या अटकेसाठी सरकारने १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. या ऑपरेशनमुळे नक्षल चळवळीला मोठा आघात बसला असल्याचे सुरक्षा यंत्रणांनी स्पष्ट केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम