जनार्दन हरिजी महाराजांनी गरीब उषाबाई गलवाडेंच्या घरी भोजन करून साजरा केला वाढदिवस

गरीब, सात्विक, आणि धार्मिक वृत्तीच्या उषाबाई गलवाडे यांच्या घरी जाऊन त्यांनी भोजन करीत केला वाढदिवस साजरा

बातमी शेअर करा...

जनार्दन हरिजी महाराजांनी गरीब उषाबाई गलवाडेंच्या घरी भोजन करून साजरा केला वाढदिवस

गरीब, सात्विक, आणि धार्मिक वृत्तीच्या उषाबाई गलवाडे यांच्या घरी जाऊन त्यांनी भोजन करीत केला वाढदिवस साजरा

सावदा l प्रतिनिधी

अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार आणि सतपंथ मंदिर संस्थानचे गादीपती परम पूजनीय महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी या वर्षी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.

जनार्दन

काठमांडू येथे झालेल्या दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील काही भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे महाराजांनी कोणत्याही प्रकारे जल्लोष न करता वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले. त्याऐवजी, त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी वेगळं केले.

जनार्दन

बुधवार दि. 28 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता विद्यानगर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळ राहणाऱ्या गरीब, सात्विक, आणि धार्मिक वृत्तीच्या उषाबाई प्रल्हाद गलवाडे यांच्या घरी जाऊन त्यांनी भोजन केले.

उषाबाई या कष्टाळू भगिनीच्या घरी जाण्याचा निर्णय घेत, महाराजांनी आपल्या वाढदिवसाचा खरा अर्थ उलगडून दाखवला.

महाराजांच्या या आगळ्या वेगळ्या वाढदिवसाच्या साजरीमुळे उषाबाईच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले.

उषाबाई गलवाडे यांनी सांगितले की, “माझे आयुष्य धन्य झाले. गेले तीन दिवस मला श्री स्वामी समर्थांचे दर्शन होत असल्याची अनुभूती होत होती.

पण आज, परम पूजनीय जनार्दन महाराजांच्या रूपाने माझ्या छोट्याशा घरात स्वामी समर्थच आले आहेत असे मला वाटले. माझ्या आयुष्यभरातील भक्ती आणि श्रद्धेला आज खरे फळ मिळाले आहे.

माझ्या आनंदाश्रूंना वाट मोकळी करून, शबरीच्या मोडक्या झोपडीत राम आले अशीच भावना व्यक्त होते.”

जनार्दन महाराजांच्या या साध्या आणि सेवाभावी वाढदिवसाच्या साजरीमुळे समाजात एक सकारात्मक संदेश पसरला आहे, आणि अनेकांना यामुळे प्रेरणा मिळाली आहे.

हे हि वाचा👇

संतांचे आशीर्वाद प्रेरणा देतात : आ. राजूमामा भोळे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम