जळगांव लोकसभा क्षेत्राच्या दौऱ्यावर सुनील भाऊ चौधरी; विविध मान्यवरांशी साधणार संवाद
आगामी नपा, मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा दौरा
जळगांव । प्रतिनिधी
शिवसेना शिंदे गटाचे जळगांव लोकसभा क्षेत्र प्रमुख व अंबरनाथ चे माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ चौधरी रविवार दि. २९ डिसेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
या दौऱ्यात ते लोकसभा क्षेत्रातील आढावा घेणार असून राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तसेच विविध मान्यवरांशी संवाद साधणार आहेत.
सुनिल भाऊ चौधरी यांचा हा दौरा आगामी नपा व मनपा निवडणुकीच्या पार्श्व भुमीवर महत्वाचा आहे. हा दौरा राजकीय घडामोडींना दिशा देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.
हे ही वाचा👇
श्री बालाजी पेठ मित्र मंडळाचा पारितोषिक वितरण समारंभ
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम