जळगावात भव्य रक्तदान शिबिर आणि मोफत नेत्र तपासणी शिबीर !

केशवस्मृती प्रतिष्ठान आणि गोळवलकर रक्तपेढी यांच्यातर्फे आयोजन

बातमी शेअर करा...

जळगावात भव्य रक्तदान शिबिर आणि मोफत नेत्र तपासणी शिबीर !

केशवस्मृती प्रतिष्ठान आणि गोळवलकर रक्तपेढी यांच्यातर्फे आयोजन

जळगाव ;- धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार, जळगाव येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, केशवस्मृती प्रतिष्ठान आणि गोळवलकर रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, जे.पी.सी. बँक रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्टचे प्रभाकर पाटील धर्मादाय रुग्णालय आणि संत बाबा गुरुदासराम चॅरिटेबल ट्रस्टच्या नेत्रज्योती धर्मादाय रुग्णालयाच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर २८ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, युनिटी चेंबर्स, गणेश कॉलनी, जळगाव येथे होणार आहे. नाशिक विभागाचे धर्मादाय सह आयुक्त श्री. व्ही.आर. सोनुने यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर पार पडेल.
जळगाव विभागाचे धर्मादाय उप आयुक्त श्री. मोहन गाडे यांनी गरजू नागरिकांना या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम