जळगावात 19 वर्षीय तरूणीची आत्महत्या

बातमी शेअर करा...

जळगावात 19 वर्षीय तरूणीची आत्महत्या

परिसरात खळबळ

जळगाव प्रतिनिधी

आई वरच्या मजल्यावर असताना तळ मजल्यावर आल्यानंतर विद्यार्थीनीने गळफास घेत आत्महत्या केली. सोमवार, 3 रोजी संध्याकाळी ही घटना उघडकीस आली. विशाखा गौतम सोनवणे (वय १९, रा. संभाजीनगर जळगाव) असे मृत युवतीचे नाव आहे. प्रकार लक्षात आल्यानंतर सोनवणे कुटुंबियांना जबर धक्का बसला. आणि आक्रोश केला. ही घटना कळाल्यानंनतर नातेवाईकांसह स्नेहीजणांनी घटनास्थळी धाव घेतली. बेशुध्दावस्थेत तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले असता तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषीत केले. विशाखा ही शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. टोकाचा निर्णय घेण्यामागचे कारण समजु शकले नाही. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम