जळगाव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा उत्साहात संपन्न

बातमी शेअर करा...

जळगाव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा उत्साहात संपन्न
राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याच्या प्रतिनिधींची निवड

जळगाव (प्रतिनिधी) – नॅशनल योगासन स्पोर्ट्स फेडरेशनच्या सहाव्या नॅशनल चॅम्पियनशिपसाठी महाराष्ट्राच्या राज्य संघ निवडीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा रविवार, २७ जुलै २०२५ रोजी सोहम योग विभाग, मू. जे. महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये पार पडली.

या स्पर्धेमध्ये सहा वयोगटांमध्ये मुला-मुलींसाठी विविध योगासन प्रकारांवर आधारित स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. स्पर्धेचे उद्घाटन अॅड. प्रमोद पाटील (केसीई सचिव), डॉ. मृणालिनी फडणवीस, डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर आणि डॉ. देवानंद सोनार यांच्या उपस्थितीत झाले.

स्पर्धेतील विजेत्यांमधून महाराष्ट्र राज्यासाठीच्या प्रतिनिधींची निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रमुख विजेते (प्रथम क्रमांक):

🧘 ट्रॅडिशनल योगासन:

  • विधी किनगे, स्पर्श विसपुते, प्रज्वल भामरे, कृष्णा सोनार, दिपाली महाले, देवेंद्र कोळी

  • किरण लुल्ला, जगदीशकुमार वैष्णव, बबिता पाटील, हर्ष लोकचंदानी, वैशाली वोडेकर, सुनील महाले

🧘 फॉरवर्ड बेंड:

  • अन्वी कोटेचा, भावेश वाणी, जान्हवी सोमन, सचिन जोहरे

  • डॉ. शरयू विसपुते, मोना गांधी, चंचल माळी

🧘 बॅक बेंड:

  • ध्रुवी बडाले, सान्वी बुरकुल, अशुतोष भोई

🧘 स्टिंग योगासन:

  • हिरल बारी, यशश्री नांद्रे, भाग्यश्री तोडकर

🧘 सुपाईन योगासन:

  • अन्वी कोटेचा, चंचल माळी

🧘 हॅंड बॅलन्स:

  • हर्षाली विरकर, मानराज चौधरी, दीपाली महाले, शाहीद पठाण

🧘 लेग बॅलन्स:

  • ऐश्वर्या खडके, नयना वाघ

🧘 कलात्मक एकल:

  • सान्वी बुरकुल, मानराज चौधरी

🧘 कलात्मक जोडी:

  • हर्षाली विरकर व ऐश्वर्या खडके

स्पर्धेसाठी प्रा. पंकज खाजबागे (सचिव), डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर (कोषाध्यक्ष), डॉ. देवानंद सोनार, प्रा. रणजीत पाटील यांचे मोलाचे योगदान लाभले. तांत्रिक समितीमध्ये प्रा. ज्योती वाघ, डॉ. शरयू विसपुते यांच्यासह १२ सदस्य सहभागी होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पंकज खाजबागे यांनी केले, तर प्रास्ताविक डॉ. देवानंद सोनार यांनी केले. शांतीपाठाने समारोप झाला.

या स्पर्धेने जिल्ह्यातील योगासने क्षेत्रातील प्रतिभावान खेळाडूंना मंच मिळवून दिला असून, त्यातून राज्यपातळीवरही यशाची वाटचाल सुरू झाली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम