जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यांचा रेड अलर्ट; प्रशासन सतर्क

बातमी शेअर करा...

जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यांचा रेड अलर्ट; प्रशासन सतर्क

जळगाव | प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी आज दुपारी ४.४० वाजता जळगाव जिल्ह्यासाठी “रेड अलर्ट” जारी केला आहे. पुढील काही तासांत जिल्ह्यात ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे, तसेच विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

प्रशासन सज्ज, नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन
निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून नागरिकांनी घराबाहेर न पडता सुरक्षित ठिकाणी थांबावे, असे आवाहन केले आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या सूचना काटेकोरपणे पाळाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपत्कालीन तयारी आणि सूचना
पोलीस, आपत्ती व्यवस्थापन व आरोग्य विभागाला तत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्ती नियंत्रण कक्षाने नागरिकांसाठी खालील महत्वाच्या सूचना जारी केल्या आहेत :

विजेच्या गडगडाटात बाहेर पडणे टाळा.

मोकळ्या जागेत असल्यास सुरक्षित इमारतीत किंवा खोल जागी आश्रय घ्या.

घरात असताना विद्युत उपकरणे आणि चार्जर बंद ठेवा.

लोखंडी शेड, उंच झाडे, पाण्याचे साठे यांच्या जवळ थांबू नका.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम