
जळगाव बसस्थानक परिसरात न्यायालयीन कर्मचाऱ्याचा मोबाईल चोरी
जळगाव बसस्थानक परिसरात न्यायालयीन कर्मचाऱ्याचा मोबाईल चोरी
जळगाव: जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरात शनिवारी, २७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजता एका न्यायालयीन कर्मचाऱ्याच्या खिश्यातून २५,५०० रुपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी दुपारी ४ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मंगेश दयाराम बिरहारी (वय ४०, रा. राणीचे बांबरूड, ता. पाचोरा), हे आपल्या कुटुंबासह राहत असून न्यायालयात नोकरी करतात. शनिवारी सकाळी ८ वाजता ते बसस्थानक परिसरात आले असता, अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिश्यातील २५,५०० रुपये किंमतीचा मोबाईल चोरला. मंगेश यांनी मोबाईलचा शोध घेतला, परंतु तो सापडला नाही. त्यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोहेकॉ प्रदीप पाटील करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम