जळगाव जनता सहकारी बँकेच्या स्थापना दिनानिमित्त स्नेहमिलन संपन्न

दाणाबाजार शाखेतर्फे रक्तदान शिबीर

बातमी शेअर करा...

जळगाव जनता सहकारी बँकेच्या स्थापना दिनानिमित्त स्नेहमिलन संपन्न
दाणाबाजार शाखेतर्फे रक्तदान शिबीर
जळगाव प्रतिनिधी
बँकेच्या स्थापनेस दि. 20 जानेवारी 2025 रोजी 46 वर्ष पूर्ण झाली असून त्या निमित्ताने बँकेच्या मुख्य कार्यालयात स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते. स्थापना दिनाचे औचित्य साधून बँकेचे मुख्यालय येथे श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य कार्यालयात बँकेचे संचालक हिरालाल सोनवणे व रेखा सोनवणे यांचे शुभ हस्ते श्री सत्यनारायण महापूजा संपन्न झाली.

यावेळी मोठ्या प्रमाणात बँकेचे सभासद, ग्राहक व हितचिंतक तसेच लोकप्रतिनिधी, विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी आदी मान्यवरांनी मुख्य कार्यालयात शुभेच्छा दिल्या. बँक नेहमीच आधुनिक तंत्रज्ञांनाचा वापर करून आपल्या ग्राहकांना अनेक सुविधा उपलब्ध करून देत असते. बँकेच्या सर्व शाखांमध्ये वर्धापनदिनाचे औचित्य साधून स्नेहसंवर्धन अभियान राबवण्यात आले. या अभियानात बँकेने ग्राहक संपर्क, कर्ज, ठेवी मोठ्या प्रमाणात संकलित करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने, उपाध्यक्ष डॉ अतुल सरोदे, संचालिका डॉ. आरती हुजुरबाजार, संचालक हरिश्चंद्र यादव, विवेक पाटील, सीए नितीन झंवर,संजय प्रभुदेसाई, डॉ सुरेन्द्र सुरवाडे, हिरालाल सोनवणे, मधुकर पाटील, संचालिका सौ संध्या देशमुख, संचालक सीए सुभाष लोहार, जवाहरभाई पटेल, बँकेचे माजी अध्यक्ष संजय बिर्ला, बीओएम सदस्य निखिल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नागमोती, वरिष्ठ महाव्यवस्थापक सुनील अग्रवाल, कर्मचारी प्रतिनिधी हेमंत चंदनकर, ओंकार पाटील, व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचप्रमाणे दाणाबाजार शाखेचा व स्टेशन रोड शाखेचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी दाणाबाजार शाखेतर्फे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. तसेच डिजिटल पेमेंट बाबत ग्राहकांना माहिती देण्यात आली. स्टेशन रोड शाखेतर्फे ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. तसेच सर्व शाखांमध्ये बँकेच्या स्थापना दिनानिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली.

शाखेत येणार्‍या प्रत्येक ग्राहकास तिळगूळ वाटप, विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन बँकेचा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दि १५ डिसेंबर २०२४ ते १५ जानेवारी २०२५ या बँकेच्या स्नेह संवर्धन अभियानात सर्व शाखांनी मिळून मोठ्या प्रमाणात ग्राहकांशी संपर्क करण्यात आला. या दरम्यान कर्ज, ठेवी, कासा डिपॉजिट व इतर व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न करण्यात आले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नागमोती यांनी सभासद, ग्राहक हितचिंतक यांचे आभार व्यक्त केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम