जामनेरात घरगुती गॅसचा काळा बाजार

बातमी शेअर करा...

 

जामनेर l प्रतिनिधी

 

शहरात  घरगुती वापराच्या गॅसचा मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर पणे वापर होत असून सदर चा गॅस हा काली पिली तसेच गॅस वर चालणाऱ्या वाहनांमध्ये सर्रास पणे भरला जात असून अवैधपणे गॅस भरणारे तथाकथित गुंड प्रवृत्तीचे असून आम्ही तर पोलिसांना हफ्ते देतो, त्यामुळे आमचे कोण वाकडे करणार ? असा तोरा मिरवतात.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, जामनेर शहरात गॅस पंप नाही. त्यामुळे घरगुती गॅस हंड्यांचा वापर गॅस किट वाहनांमध्ये सर्रासपणे करण्यात येत आहे. तर यामागील गौडबंगाल काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रकरणची चौकशी होऊन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सुज्ञ नागरिकांमध्ये होत आहे. तर अवैध गॅस भरणारे महाजन नामक व्यक्ती दादागिरीने सांगतो की, मी तर पोलिसांना हफ्ते देतो. माझा व्ययसाय अवैध असला तरी कोण बंद करणार ?

 

दरम्यान सदर घरगुती गॅस चा काळा बाजार रोखण्यासाठी पुरवठा विभाग व पोलीस विभागाने संयुक्तपणे कारवाई करून घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार रोखून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम