
जामनेर तालुक्यात “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” उत्साहात पार
जळगाव, : महसूल मंडळ, जामनेर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर योजना अंतर्गत जामनेर तालुक्यातील माळी समाज मंगल कार्यालय येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विविध विभागांमार्फत एकूण ४५१ लाभार्थ्यांना विविध सेवा आणि लाभ देण्यात आले.
यामध्ये संजय गांधी योजना DBT प्रक्रियेद्वारे २३० लाभार्थ्यांना लाभ मिळाला, ॲग्रीस्टॅक अंतर्गत १० लाभार्थ्यांना सुविधा पुरविण्यात आल्या. तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत ३५ सेवा देण्यात आल्या.
पुरवठा शाखेद्वारे शिधापत्रिका लाभ ८९ लाभार्थ्यांना देण्यात आले. तसेच सेतू केंद्राच्या माध्यमातून उत्पन्न दाखले १८, जातीचे दाखले २१, वय अधिवास व रहिवास दाखले २८ लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले. इतर विभागांमार्फत २० लाभार्थ्यांना सेवा देण्यात आली.
या शिबिरामुळे शेतकरी, गरीब व गरजूंना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाला असून, नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. महसूल मंडळ जामनेर यांच्या प्रयत्नातून या शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम