जिल्हाधिकारी यांच्या हस्ते बंदमुक्त कामगारांना दिलासा

विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आदेश

बातमी शेअर करा...

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते बंदमुक्त कामगारांना दिलासा

विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आदेश

जळगाव (प्रतिनिधी): जिल्ह्यातील बंदमुक्त कामगारांच्या समस्यांकडे लक्ष देत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वतः पुढाकार घेत कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी नुकतीच कामगारांशी भेट घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

या भेटीदरम्यान कामगारांनी घरकुल योजना, रेशन कार्ड, जॉब कार्ड आदी योजनांमध्ये नाव नोंदणी व लाभ मिळण्यासंबंधी अडचणी मांडल्या. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावर तातडीने कार्यवाही करत संबंधित अधिकाऱ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी निर्देश दिले.

विशेष म्हणजे, कामगारांच्या लहान मुलांना पादत्राणे नसल्याचे पाहून जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतःच्या पुढाकाराने फुटवेअर उपलब्ध करून दिली आणि आपल्या हाताने ती मुलांच्या पायात घातली. या भावनिक प्रसंगामुळे उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आले.

यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाला भेट दिली. तिथे त्यांनी बंदमुक्त कामगारांची भेट घेतली व त्यांच्या अनुभवांची माहिती घेतली. यावेळी शुगर कॅन आयडी आणि भविष्यातील कार्यवाही संदर्भात अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा झाली.

कामगार कल्याणासाठी जिल्हा प्रशासनाच्या या सकारात्मक आणि संवेदनशील पावलांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम