
जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात 7 अर्ज प्राप्त
जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात 7 अर्ज प्राप्त
जळगाव समस्याग्रस्त व पिडीत महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या तक्रारी / अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन जिल्हा स्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी राबविण्यात येतो.
त्यानुषंगाने जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन दिनांक २१ एप्रिल २०२५ सोमवार रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे आयोजित करण्यात आला होता. या लोकशाही दिनात सात अर्जदारांचे अर्ज प्राप्त झालेले असून, त्यापैकी 5 अर्ज हे उपनिबंधक कार्यालयाचे, । अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय व 1 अर्ज संजय गांधी योजना यांच्या कार्यालयाचे होते. हे अर्ज संबधित कार्यालयाकडे कार्यवाही करण्याकरिता पाठविण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम