
जि.प.मध्ये रखडलेल्या पदोन्नत्यांना मुहूर्त
२१ आरोग्य सेवकांना आरोग्य सहाय्यकपदी पदोन्नती
जळगाव : जिल्हा परिषदेअंतर्गत विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या आरोग्य सेवक यांचा गेले अनेक दिवस रखडलेला पदोन्नती चा प्रश्न अखेर सुटला असून शुक्रवार दि.९ मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी स्वत समुपदेशन घेऊन २१ आरोग्य सेवकांना आरोग्य सहाय्यकपदी पदोन्नती देण्यात आली.
आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणाऱ्या आरोग्य कर्मचारी यांच्या पदोन्नती चा विषय गेले अनेक दिवस प्रलंबित होता. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी जळगाव जिल्हा परिषदेत रुजू झाल्यानंतर प्रलंबित पदोन्नत्या, आणि इतर बाबींचा आढावा घेऊन पदोन्नतीचे प्रश्न निकाली काढण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत व शिक्षण विभागातील पदोन्नतीचा प्रश्न गेल्या आठवड्यात मार्गी लावल्यानंतर शुक्रवार ०९ मे रोजी समुपदेशनाने जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू
महाराज सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांच्या उपस्थितीत समुपदेशन प्रक्रिया घेण्यात आली.
यात २१ आरोग्य सेवक यांना आरोग्य सहाय्यक पदी रिक्त ठिकाणी पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर आदी उपस्थित होते.
जि.प.मध्ये रखडलेल्या पदोन्नत्यांना मुहूर्त
२१ आरोग्य सेवकांना आरोग्य सहाय्यकपदी पदोन्नती
जळगाव | प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील रखडलेल्या पदोन्नती प्रक्रियेला अखेर गती मिळाली असून, २१ आरोग्य सेवकांना आरोग्य सहाय्यकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. शुक्रवार, ९ मे रोजी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांच्या उपस्थितीत समुपदेशनाद्वारे ही पदोन्नती प्रक्रिया पार पडली.
गेल्या अनेक दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत आरोग्य सेवकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया प्रलंबित होती. जिल्हा परिषदेत रुजू झाल्यानंतर सीईओ मिनल करनवाल यांनी प्रलंबित पदोन्नत्यांचा आढावा घेत पदोन्नती प्रक्रिया तातडीने मार्गी लावण्याचे आदेश दिले होते.
या प्रक्रियेत २१ आरोग्य सेवकांना रिक्त पदांवर पदोन्नती मिळाली. समुपदेशनाच्या वेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम