
जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील पाच दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे उदघाटन संपन्न
जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील पाच दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे उदघाटन संपन्न
महाराष्ट्रासहित विविध राज्यातील ८० प्राध्यापकांचा सहभाग
जळगाव, : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंटतर्फे शिक्षण मंत्रालयाचे इनोव्हेशन सेल व अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या सहयोगाने आयोजित फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे उदघाटन औरंगाबाद येथील मॅजिक इन्क्यूबेटरचे संचालक श्री. प्रसाद कोकीळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. आठवडाभराच्या या प्रशिक्षण कार्यक्रमात जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल, अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील प्राध्यापकासहित महाराष्ट्र व विविध राज्यातील ८० जण सहभागी होणार आहे.
यावेळी कार्यक्रमाची रूपरेषा व उद्दिष्टे समजावून सांगताना जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, “इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप” हा या प्रशिक्षण वर्गाचा मुख्य विषय असून प्राध्यापकांनी विध्यार्थ्यांना इनोव्हेशनसाठी एंकरेज करावे व आधी स्वता अपडेट रहावे यासाठी हा विषय हाती घेतल्याचे सांगितले तसेच तंत्रज्ञान, संशोधन आणि अध्यापन पद्धती सतत बदलत असतात. उत्तम अध्यापनासाठी केवळ विषयाचे ज्ञान पुरेसे नसते, तर विद्यार्थ्यांपर्यंत ते प्रभावीपणे पोहोचवण्याचे कौशल्यही लागते व उद्योग जगतातील बदल तसेच गरजा लक्षात घेऊन प्राध्यापकांना नवीन ट्रेंड्स, संकल्पना, संशोधन पद्धती याबद्दल माहिती मिळावी व सॉफ्ट स्किल्स, संशोधन लेखन, इनोव्हेशन, स्टार्टअप, एआय, डेटा सायन्स अशा नव्या कौशल्यांचे प्रशिक्षण प्राध्यापकांना मिळावे या अनुषंगाने जी. एच. रायसोनी महाविद्यालयात फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित करण्यात आला व सलग तिन वर्ष महाविद्यालयात वर्षभर घेण्यात आलेल्या विविध उपक्रमाचे परीक्षण करून ‘३.५’ स्टार रेटिंग’ देणारे भारत सरकारचे केंद्रीय शिक्षण मंत्रालय व इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल यांचे देखील या उपक्रमात कोलेब्रेशन असणे हे आमच्या इस्टीट्युटसाठी अत्यंत महत्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात मॅजिक इन्क्यूबेटरचे संचालक श्री. प्रसाद कोकीळ यांनी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि उद्योजकता : शैक्षणिक संस्थांमधील भूमिका” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी शैक्षणिक जीवनात इनोव्हेशनचा दृष्टिकोन कसा रुजवता येईल, स्टार्टअप संस्कृतीचे महत्त्व, फोलिंग इन लव्ह विथ द प्रॉब्लेम तसेच प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता वृत्ती कशी विकसित करावी यावर स्पष्ट आणि प्रात्यक्षिकांसह संवाद साधला. यानंतर ट्रिनेट्रिनी क्वांटम प्रायव्हेट लिमिटेड मुंबईचे सीईओ श्री. योगेश उदगीरे यांनी “डिकोडिंग कस्टमर नीड्स – कस्टमर डिस्कव्हरी विथ इम्पॅथी मॅप अँड जर्नी मॅप” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तर दुसऱ्या सत्रात कमिन्स इंडियाचे इनोव्हेशन लीडर- श्री. तुषार एस. कनिकदाळे यांनी “क्रिएटिव्हीटी अँड आयडिया” यावर मार्गदर्शन करत प्रॅक्टिकल टूल्स फोर क्रिएटिव्हिटी अँड आयडिया जनरेशन, ट्रीज, डिझाईन थिंकिंग, सिस्टिमॅटिक इनोवेशन एक्सप्लेनेड विथ रियल लाइफ एक्झामपल्स, इंडस्ट्री स्ट्रेटेजीस टू ट्रान्सफॉर्म आयडियाज फ्रॉम लॅब टू मार्केट व ऑपॉर्च्युनिटी टू एंगेज इन लाइव्ह ग्रुप ऍक्टिव्हिटीज या विविध विषयावर संवाद साधला.
इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप क्षेत्रातील आघाडीचे उद्योगतज्ज्ञ, नामांकित शैक्षणिक संस्थांमधील तज्ज्ञ या उपक्रमात मार्गदर्शन करणार असून सहभागी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील अत्याधुनिक माहिती आणि कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे. तसेच महाराष्ट्र व इतर राज्यांमधील विध्यार्थी, नवउद्योजक व संशोधक यांच्यासाठी हा कार्यक्रम खुला असून ज्ञानवाढीला प्रोत्साहन देण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे असल्याची माहिती जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांनी दिली.
सदर उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. ज्योती जाखेटे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. विशाल राणा यांनी मानले.
पुढील सत्रात हे करणार मार्गदर्शन
या पाच दिवसीय उपक्रमात एआयसी महिंद्रा विद्यापीठचे सीईओ इस्माईल अकबानी, जेआयआयएफचे उपाध्यक्ष भरत ओसवाल, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठमधील इन्क्युबेशन अँड लिंकेजेसचे संचालक डॉ. भूषण चौधरी, सीओईपी वेलनेस सेंटर “मित्रा”च्या प्रमुख डॉ. क्षिप्रा मोघे, नाशिक येथील कॉग्निडॉल्फचे मयूर तांबे, एआयसीटीई एमओई इनोव्हेशन सेलचे इंडोव्हेशन मॅनेजर उमेश राठोड, खान्देश उद्योग प्रबोधिनीचे हर्षल विभांडिक, अनंतम इकोसिस्टम्सचे संस्थापक चिंतन ओझा हे स्टार्टअप इकोसिस्टम, इनोव्हेशन मेथडोलॉजी, डिझाईन थिंकिंग, आयपीआर, फायनान्शियल प्लॅनिंग, लीन स्टार्टअप, बिझनेस मॉडेल कॅनव्हास, गो-टू-मार्केट स्ट्रॅटेजी, उद्योजकता शिक्षणातील नवनवीन पद्धती यावर सखोल मार्गदर्शन करणार आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम