
जैन इरिगेशन सिस्टीम्सला Consolidated करपश्चात २५.७ कोटींचा नफा
जैन इरिगेशन सिस्टीम्सला Consolidated करपश्चात २५.७ कोटींचा नफा
लेखापरिक्षण केलेले चौथ्या तिमाहीसह वार्षिक निकाल जाहिर
जळगाव (प्रतिनिधी):- मायक्रो इरिगेशन सिस्टम्स, पीव्हीसी पाईप्स, एचडीपीई पाईप्स, प्लास्टिक शीट्स, प्रक्रिया केलेली कृषी उत्पादने, नवीकरणीय ऊर्जा उपाय, टिश्यूकल्चर रोपे, वित्तीय सेवा आणि इतर कृषी निविष्ठा यांच्या उत्पादनामध्ये गुंतलेलल्या जगातील दुसऱ्या व भारतातील सगळ्यात मोठ्या ठिंबक सिंचन प्रणालीत जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड (BSE: 500219 / NSE: JISLJALEQS), या कंपनीचे ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीचे आणि वर्षाचे लेखापरीक्षण केलेले (ऑडिटेड) Consolidated आणि Standalone निकाल जाहीर करण्यात आले. यात कंपनीला वर्षाच्या एकत्रित करपश्चात नफा (PAT) २५.७ कोटी रूपये झाला आहे.
जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. जळगाव येथे आज (दि. १४) ला झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या चौथी तिमाही आणि आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण मंजूर करण्यात आले. जैन इरिगेशन कंपनीने वर्षाचे Consolidated उत्पन्न ५७७९.३ कोटी रूपये नोंदवले गेले. इबिडा (EBIDTA) ७१६.८ कोटी रूपये नोंदवला. तर वर्षाचा एकत्रित करपश्चात नफा (PAT) २५.७ कोटी रूपये झाला. ३१ मार्च २०२५ रोजी संपणाऱ्या वर्षाचे स्वतंत्र उत्पन्न ३२५९ कोटी रूपये झाले. तर चौथ्या तिमाहीतील (Q4 2025) स्वतंत्र उत्पन्न १०२७.३ कोटी रूपयांवर पोहोचले.
“२०२४-२५ आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत (Q4FY25 मध्ये) कंपनीने एकूण महसुलात १.३ टक्के सुधारणा करत स्थिर कामगिरी नोंदवली, तसेच EBITDA मध्ये थोडी सुधारणा दिसून आली. संपूर्ण वर्षात महसूलात झालेली घट प्रामुख्याने देशांतर्गत व्यवसायामुळे झाली. मात्र, कामकाजातील रोख प्रवाहात (कॅश फ्लोमध्ये) लक्षणीय सुधारणा झाली असून हे कार्यक्षम खेळत्या भांडवलाच्या व्यवस्थापनामुळे शक्य झाले आहे. आम्ही विशेषतः पाईपिंग, हाय-टेक अॅग्री आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ या आमच्या मुख्य व्यवसायांवर लक्ष केंद्रित करत आहोत. पुढील काळात सरकारच्या पायाभूत सुविधा खर्चामुळे आणि स्थिर कृषी उत्पादनामुळे आम्हाला किरकोळ मागणीत पुनरुज्जीवन होईल अशी अपेक्षा आहे. आमचे लक्ष्य कर्ज कमी करणे, खेळते भांडवल कार्यक्षम करणे आणि रोख प्रवाह (कॅश फ्लो) सुधारणा करणे आहे.”
अनिल जैन, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम