
जैवविविधतेच्या संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे- माधुरी कानिटकर
आरोग्य विज्ञान विद्यापीठात हिवाळी हंगामातील जैवविविधता सर्वेक्षण शिबिर संपन्न
जैवविविधतेच्या संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे- माधुरी कानिटकर
आरोग्य विज्ञान विद्यापीठात हिवाळी हंगामातील जैवविविधता सर्वेक्षण शिबिर संपन्न
नाशिक प्रतिनिधी
पर्यावारणाचा समतोल राखत जैवविविधतेच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि नाशिक येथील अरण्यानी बायोकन्झरवेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ परिसरात हिवाळी हंगामात जैवविविधता सर्वेक्षण करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमास मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) अध्यक्षस्थानी समवेत मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, लेफ्टनन्ट जनरल श्री. राजीव कानिटकर, विद्यापीठाच्या हरित कक्षाचे प्रमुख डॉ. सुनिल फुगारे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगीतले की, पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे त्यासाठी प्रत्येकाने हातभार लावणे आवश्यक आहे. विद्यापीठाचा ’ग्रीन कॅम्पस’ उपक्रमाच्या माध्यतातून मोठया प्रमाणात वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन करण्यात आले आहे. त्यामुळे विविध प्रजातीच्या पक्षांची अधिवास विद्यापीठात पहावयास मिळतो. नाशिक येथील अरण्यानी बायोकन्झरवेशन सोसायटीच्या सहकार्यातून हिवाळा ऋतूमध्ये विद्यापीठात पक्षी गणणा करण्यात आली आहे तसेच छायाचित्र घेण्यात आले आहेत. या उपक्रमातून प्राप्त माहिती सर्वांना अभ्यासाकरीता विद्यापीठाच्या ’इक्षणा’ म्युझियममध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, विद्यापीठ परिसरात वड, पिंपळ व पळसाच्या वृक्षांची मोठया प्रमाणात लागवड करण्यात येत आहे. जेणेकरुन पक्षांचा वावर वाढेल. पक्षांना अन्नासाठी फुलझाडे महत्वपूर्ण असतात त्यांचे संवर्धन करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी मा. लेफ्टनन्ट जनरल श्री. राजीव कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, विद्यापीठात पक्षांकरीता सुयोग्य वातावरण आहे. पक्ष्यांना पाणी व निवारा सुलभतेने मिळत त्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास येते. उन्हाळयात पक्षांना पिण्यासाठी मुबलक पाणी मिळावे यासाठी विशेष काळजी घेतली जाईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी अरण्यानी बायोकन्झरवेशन सोसायटीचे सल्लागार श्री. सतीश गोगटे यांनी सांगीतले की, हिवाळी हंगामात विद्यापीठात पहिल्यांदाच पक्षी गणणा करण्यात आली. मा. कुलगुरु महोदया यांच्या संकल्पनेतून विद्यापीठ परिसरात पक्षी गणणेचा अनुभव पक्षीमित्रांसाठी सस्मरणीय आहे. या पक्षीगणणेत रशियात वास्तव्य असलेला स्थालांतरीत पक्षी विद्यापीठात पहावयास मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठ परिसरात हिवाळी हंगामातील पक्षीनिरीक्षणात 55 पेक्षा अधिक प्रजातींचे 600 पेक्षा अधिक पक्षी आढळले आहेत त्यात लहान मिनीवेट पर्पल सनबर्ड, बाया, पायड क्रेस्टेड कोकिळ आणि लग्गर, फाल्कन, खवले स्तनधारी मुनिया, पर्पल रंप्ड सनबर्ड, टेलर बर्ड, टिकेलब्लू फ्लायकॅचर, घुबड आणि शेपटीसह असंख्य मोर अशा सुंदर पक्षी दिसले.
या कार्यक्रमाचे समन्वयन व सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मा. कुलगुरु महोदया यांच्या हस्ते अरण्यानी बायोकन्झरवेशन सोसायटीच्या सदस्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
विद्यापीठात आयोजित पक्षीगणणा शिबिरामध्ये अरण्यानी बायोकन्झरवेशन सोसायटीच्या सदस्यांच अध्यक्ष श्री. अमोल दराडे समवेत श्री. प्रमोद दराडे, गंगाधर आघाव, रोशन पोटे, श्री. पंकज चव्हाण, श्री. गणेश वाघ, श्री. सतिष गोगटे, श्री. अनंत सरोदे, श्री. किशोर वडनेरे, डॉ. सीमा पाटील, डॉ. जयंत फुलकर, डॉ. वेद शिंदे, श्री. नितीन बिलदिकर, श्री. हितेश पटेल, श्री. शंकर लोखंडे, श्री. विकास गारे, श्री. संदीप काळे, श्री. ओमकार चव्हाण आदी पक्षीप्रेमी सहभागी झाले होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम