ज. सु .खडके प्राथमिक विद्यामंदिर येथे नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती

तुम मुझे खून दो; मै तुम्हे आजादी दूंगा! हा नारा देऊन परिसर दणाणला

बातमी शेअर करा...

ज. सु .खडके प्राथमिक विद्यामंदिर येथे नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती
तुम मुझे खून दो; मै तुम्हे आजादी दूंगा! हा नारा देऊन परिसर दणाणला

जळगाव प्रतिनिधी

ज. सु .खडके प्राथमिक विद्यामंदिर येथे नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील व श्रीमती धुमाळ यांच्या हस्ते नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन घेण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती तायडे मॅडम यांनी केले. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या कार्याविषयी व बाल जीवनातील प्रसंगांवर तायडे मॅडम यांनी प्रकाशझोत टाकला . सदर प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील सरांनी विद्यार्थ्यांशी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या शौर्य कथा विद्यार्थ्यांना सांगितल्या . इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी कदम कदम बढाये जा खुशी के गीत गाये जा! हे गीत सामूहिक रित्या सादर केले.

त्याचप्रमाणे चौथीच्या विद्यार्थ्यांनी जय हिंद, तुम मुझे खून दो; मै तुम्हे आजादी दूंगा! हा नारा देऊन परिसर दणाणून टाकला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले शेवटी कार्यक्रम प्रमुख श्रीमती तायडे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले. संस्थेच्या चेअरमन माननीय सिंधुताईंनी तसेच ललित भाऊ कोल्हे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम