डंपरची दुचाकीला धडक ; एक जण ठार !

पाचोरा ते भडगाव रस्त्यावरील घटना

बातमी शेअर करा...

डंपरची दुचाकीला धडक ; एक जण ठार !
पाचोरा ते भडगाव रस्त्यावरील घटना

पाचोरा I प्रतिनिधी

डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना पाचोरा ते भडगाव रस्त्यावरील आशीर्वाद हॉटेल समोर भरधाव वेगाने जाणाऱ्या २२ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता घडली आहे. हिलाल काशीनाथ साळवे वय ५८ रा. पाचोरा, असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार हीलाल साळवे हे २२ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता दुचाकी पक्रमांक एमएच १९ डीई २७३८ ने पाचोरा येथून गाडगेबाबा नगरात येत असतांना त्यांच्या मागून भरधाव वेगाने येणारा डंपर क्रमांक (एमएच १५ एचझेड ८८७९) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर डंपर चालका हा वाहन घेवून पसार झाला होता. पोलीस ठाण्यात डंपरवरील चालक पवनकुमार राजकुमार महंतो वय ३७ रा. काडसमर झारखंड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार पांडूरंग सोनवणे पुढील तपास करीत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम