डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात दोषी संजय रॉयला जन्मठेप

सियालदाह न्यायालयाचा निर्णय

बातमी शेअर करा...

डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात दोषी संजय रॉयला जन्मठेप
सियालदाह न्यायालयाचा निर्णय
कोलकाता I वृत्तसंस्था

कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात दोषी संजय रॉयला सियालदाह न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही शिक्षा १६४ दिवसांच्या सुनावणीनंतर झाली. न्यायालयाने हा खटला दुर्मिळातील दुर्मिळ म्हणून मान्य न केल्यामुळे दोषीला मृत्युदंडाऐवजी जन्मठेप देण्यात आली.

८-९ ऑगस्ट २०२४ च्या रात्री आरजी कार मेडिकल कॉलेज-रुग्णालयात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची क्रूर हत्या करण्यात आली होती. तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत, गंभीर जखमांसह आढळून आला होता. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली. संजय रॉयला १० ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती.न्यायाधीश अनिर्बान दास यांनी संजयला बोलण्याची संधी दिली आणि त्याला त्याच्या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले असल्याचे स्पष्ट केले. शिक्षेच्या निर्णयासाठी १६० पानांचे निकालपत्र तयार करण्यात आले.

न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला पीडितेच्या कुटुंबाला १७ लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला. मात्र, कुटुंबाने या भरपाईचा स्वीकार करण्यास नकार दिला. त्यांनी आपल्या मुलीला न्याय मिळावा यावर अधिक भर दिला. ही घटना केवळ वैयक्तिक किंवा कौटुंबिक दु:खापुरती मर्यादित राहिली नाही, तर ती समाजाच्या सुरक्षा व्यवस्थेवरील प्रश्नचिन्ह ठरली. यामुळे महिलांच्या सुरक्षिततेवर गंभीर विचार करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम