
डॉ. घनश्याम कोचुरे यांच्या स्मृतीनिमित्त विद्यार्थ्यांचा गौरव, समाजरत्न पुरस्कारांचे वितरण
डॉ. घनश्याम कोचुरे यांच्या स्मृतीनिमित्त विद्यार्थ्यांचा गौरव, समाजरत्न पुरस्कारांचे वितरण
जळगाव, दि.4 ऑगस्ट – जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत भवन येथे स्व. डॉ. घनश्याम कोचुरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त एक प्रेरणादायी आणि भव्य कार्यक्रम संपन्न झाला. हजरत बिलाल (रजि.) बहुउद्देशीय संस्था आणि लोकशक्ती प्रतिष्ठान, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पराग घनश्याम कोचुरे होते.
या कार्यक्रमात १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षेत यशस्वी ठरलेल्या ५०० विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी प्रभावी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली, ज्यात समाज व शिक्षण या विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रभावी मते मांडली. विजेत्यांना पारितोषिके व प्रमाणपत्र देण्यात आली.
आदर्श शाळा पुरस्कार लूकंड कन्या शाळेला प्रदान करण्यात आला. तसेच आदर्श शिक्षक सन्मान व प्रेरणादायी भाषण सत्र पार पडले.
कार्यक्रमात समाजरत्न पुरस्कार खालील समाजसेवकांना प्रदान करण्यात आले :
-
अजमल शाह अब्दुल्ला शाह
-
अॅड. सलीम इसाहक शेख
-
मोहसिन खाटीक
-
अशफाक बागवान
-
इरफान बागवान
-
पी. एम. पाटील
-
साबीर शाह
-
वर्षा अहिरराव
-
जमीलुद्दीन शेख
-
अमजद पठाण
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बापूसाहेब दिलीप पाटील (कुस्ती समिती), खलील शेख (शिक्षण विस्तार अधिकारी), नीता वानखेडकर, रफिक शेख, धारा ठाकर (लोकशक्ती प्रतिष्ठान), अकिल अब्दुल्ला, जागृती सुर्वे, मयूर सोनार, प्रेरणा गुजर, पंकज सुर्वे यांची उपस्थिती होती.
पराग कोचुरे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना मेहनत, शिस्त आणि समाजसेवेच्या मूल्यांवर भर देत प्रेरणा दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजमल शाह यांनी केले, तर आभार प्रदर्शन अकिल पहलवान यांनी केले. अॅड. सलीम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम