
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार – जळगाव जिल्ह्यास राज्यस्तरीय गौरव!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार – जळगाव जिल्ह्यास राज्यस्तरीय गौरव!
जळगाव l प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, चाळीसगाव यांनी समाज कल्याण विभागाच्या कामकाजात उल्लेखनीय कार्य करत राज्यस्तरीय सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार पटकावला आहे. या पुरस्काराअंतर्गत चाळीसगाव येथील शाळेला राज्यस्तरीय प्रथम क्रमांक बहाल करण्यात आला असून ₹५ लाखांचा धनादेश देखील प्रदान करण्यात आला आहे.
या गौरवप्राप्त पुरस्काराचा वितरण सोहळा १० जून २०२५ रोजी मुंबई येथे पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग श्री. योगेश पाटील व मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली महाजन यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
शासकीय निवासी शाळा, चाळीसगाव यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, निवासी सुविधा, नियमित आरोग्य तपासणी, पोषण आहार, अभ्यासिका, कौशल्यविकास प्रशिक्षण, डिजिटल शिक्षण आणि पालक-शिक्षक संवाद आदी बाबींमध्ये विशेष लक्ष दिले. त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीची सक्रिय भूमिका, कर्मचार्यांची कार्यतत्परता व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले प्रयत्न हेच या पुरस्कारामागचे मुख्य कारण ठरले.
जिल्हाधिकारी, समाज कल्याण विभाग, शिक्षक व स्थानिक प्रशासन यांचे सहकार्य या यशामध्ये समाज कल्याण विभागाचे अधिकारी वर्ग, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद, तसेच स्थानिक प्रशासनाचे महत्वाचे योगदान आहे. त्यांची समन्वयात्मक व सकारात्मक भूमिका ही प्रेरणादायी ठरली आहे.
या पुरस्कारामुळे जळगाव जिल्ह्याच्या सामाजिक न्याय व कल्याण क्षेत्रातील कामगिरीस राज्यस्तरावर मान्यता मिळाली असून इतर जिल्ह्यांसाठी एक आदर्श निर्माण झाला आहे.
“हा पुरस्कार म्हणजे संपूर्ण जिल्ह्याच्या प्रयत्नांची पावती असून, आगामी काळातही ही गुणवत्ता व सेवा सातत्याने टिकवण्याचा निर्धार आहे,” असे मत सहाय्यक आयुक्त श्री. योगेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
जळगाव जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळा, चाळीसगाव यांचा सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. यामुळे जिल्ह्यातील अन्य शाळांना व विभागांना प्रेरणा मिळून सामाजिक समतेचा अधिक व्यापक प्रसार साधता येईल.
*विभागस्तरावर जळगाव जिल्ह्यातील संस्थाचा गौरव*
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, भुसावळ
पत्ता: मु.पो. भुसावळ,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, भुसावळ
पत्ता: मु.पो. भुसावळ, ता. भुसावळ, तर अनुदानित वसतिगृह गटातून
जळगाव जिल्हा हरिजन सेवक संघ संचालित हरिजन कन्या छात्रालय, जळगाव
पत्ता: मु.पो. जळगाव, ता. जि. जळगाव यांना पुरस्कार मिळाला. या संस्थानाही यावेळी गौरविण्यात आले.
या संस्थांनी सामाजिक न्याय व कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम