
डॉ. राधेश्यामदादा चौधरी यांची भाजप जळगाव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती; अभिनंदनाचा वर्षाव
डॉ. राधेश्यामदादा चौधरी यांची भाजप जळगाव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती; अभिनंदनाचा वर्षाव
पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंगराजे पाटील यांनी दिल्या शुभेच्छा
जळगाव – भारतीय जनता पक्षाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी डॉ. राधेश्यामदादा चौधरी यांची नियुक्ती झाल्यानंतर जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांना सन्मानपूर्वक भेटी देत शुभेच्छा दिल्या.
या पार्श्वभूमीवर राज्यातील पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंग राजे पाटील यांनी चौधरी यांची सदिच्छा भेट घेऊन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी नगरसेवक चंद्रशेखर पाटील, साहित्यिक प्रफुल नाना पाटील वडनगरीकर, बापू पाटील आणि विशाल पाटील यांचीही उपस्थिती होती. या भेटीत सौहार्द, संघटनात्मक विचार आणि कार्यकर्त्यांप्रती निष्ठा यांचा सकारात्मक अनुभव मिळाला.
डॉ. चौधरी हे स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ असून सृष्टी हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी हजारो रुग्णांवर सेवा केली आहे. त्यांचा वैद्यकीय, सामाजिक अनुभव आणि सेवाभाव लक्षात घेऊन पक्षाने त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली.
भेटीत पुढील कार्यपद्धती, युवकांचे प्रबोधन आणि संघटनवाढीवर चर्चा झाली. कविवर्य प्रफुल पाटील यांनी “राजकारणातही कवीचे मन हवे,” असे सांगत साहित्यिक भावस्पर्श दिला. बापू पाटील आणि विशाल पाटील यांनीही संघटनासाठी सहकार्याचे आश्वासन दिले.
डॉ. चौधरी यांनी यावेळी सांगितले की, “पक्षाच्या धोरणांशी निष्ठा ठेवत, कार्यकर्त्यांच्या सहभागाने जळगाव जिल्ह्यात भाजप अधिक बळकट करणार आहे.”
या सर्वांच्या उपस्थितीने पक्षातील ऐक्य, सुसंवाद आणि नवसंघटनाची जाणीव होत असून ही निवड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारी ठरली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम