
डॉ. शिवाजी पाटील नवी दिल्लीत ‘मानद डॉक्टरेट’ पदवीने सन्मानित
डॉ. शिवाजी पाटील नवी दिल्लीत ‘मानद डॉक्टरेट’ पदवीने सन्मानित
जळगाव: ग्रामीण आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेत, सरस्वती विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजी पाटील यांना ‘नासा ट्रस्ट’च्या एसएसआर विद्यापीठातर्फे नवी दिल्ली येथे ‘मानद डॉक्टरेट’ पदवी आणि ‘शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ६ सप्टेंबर रोजी दिल्लीतील विश्व युवक केंद्रात झालेल्या या सोहळ्यात महाराष्ट्रातून हा सन्मान मिळवणारे ते एकमेव शिक्षणतज्ज्ञ ठरले.
शैक्षणिक योगदानाचा गौरव
डॉ. पाटील यांनी “महाराष्ट्रातील आदिवासी व ग्रामीण शाळांमध्ये नवोन्मेषी शैक्षणिक उपक्रमांची अंमलबजावणी” या विषयावर केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा बहुमान देण्यात आला. त्यांच्या कार्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षणाला नवी दिशा मिळाली आहे.
पुरस्कार सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यात माजी आय.जी. पी. के. मिश्रा, निवृत्त न्यायमूर्ती राजेश टंडन, डॉ. दिना सुनील, प्रा. के. पी. सिंग आणि डॉ. राकेश राही यांचा समावेश होता. या सर्व मान्यवरांनी डॉ. पाटील यांच्या ग्रामीण आणि आदिवासी शिक्षण क्षेत्रातील योगदानाचे भरभरून कौतुक केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम