ऐरोली-कटाई बोगद्यामुळे ४५ मिनिटांचे अंतर ५ मिनिटांत

अंबरनाथ करांनी मानले खा. डॉ श्रीकांत शिंदेचे आभार

बातमी शेअर करा...

बातमीदार | दि ५ जानेवारी

       ऐरोली-कटाई बोगद्यामुळे ४५ मिनिटांचे अंतर ५ मिनिटांत
ऐरोली-कटाई प्रकल्पातील पारसिक बोगद्यातून खोदल्या जाणाऱ्या बोगद्याची कामे अंतिम टप्प्यात असून फेब्रुवारी महिन्यात त्यापैकी एक मार्गिका सुरू करण्यात येणार आहे.

       हा बोगदा म्हणजे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ करांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. त्याबद्दल अंबरनाथ चे माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ चौधरी यांनी आभार व्यक्त केले आहेत.

      ऐरोली-मुंब्रा दरम्यानचा अवघ्या काही मिनिटांमध्ये पूर्ण होऊ शकणार आहे. या बोगद्यामुळे बेलापूर ते वाय जंक्शनपर्यंत ४५ मिनिटांचे अंतर पाच मिनिटांत कापता येईल.

       कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, दिवाकडून येणाऱ्या वाहनांना कल्याण फाट्याकडे न जाता काटई येथून बोगद्यातून कमीत कमी वेळेत ऐरोलीकडे बाहेर पडता येईल.

      एमएमआर क्षेत्रातील १.७ किलोमीटर लांबीचा सर्वात मोठा बोगदा असून ऐरोली ते कटाई अंतर ५ किलोमीटर आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम