
डॉ. सुशिल महाराज विटनेरकर यांना अमेरिकेतील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीची डॉक्टरेट पदवी
डॉ. सुशिल महाराज विटनेरकर यांना अमेरिकेतील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीची डॉक्टरेट पदवी
नवलसिंगराजे पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार
जळगाव प्रतिनिधी
राष्ट्रीय कथाकार, कीर्तनकार आणि महंत प्रा. हभप डॉ. सुशिल महाराज विटनेरकर यांना फार्मास्युटिकल रिसर्च या विषयात अमेरिकेतील प्रतिष्ठित वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांच्यातर्फे नुकतीच सर्वोच्च डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या या यशाचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंगराजे पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
या गौरवसमारंभ प्रसंगी कवी प्रफुल नाना वडनगरीकर, हभप भरत महाराज म्हैसवाडीकर, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संदीप पाटील, विनोद पाटील आणि चेतन चौधरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी डॉ. सुशिल महाराज यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
डॉ. सुशिल महाराज विटनेरकर हे अध्यात्म, कीर्तन, कथा व संशोधन क्षेत्रात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्व असून, त्यांच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जात आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम