
डॉ. अण्णासाहेब जी डी बेंडाळे महिला महाविद्यालयात स्कूल कनेक्ट 2.0 अभियान
विषय निवडीचे स्वातंत्र्य, मुख्य आणि गौण विषयासह पदवी याबाबत मार्गदर्शन
डॉ. अण्णासाहेब जी डी बेंडाळे महिला महाविद्यालयात स्कूल कनेक्ट 2.0 अभियान
विषय निवडीचे स्वातंत्र्य, मुख्य आणि गौण विषयासह पदवी याबाबत मार्गदर्शन
जळगाव I प्रतिनिधी
महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व महाराष्ट्र शासनाचे स्कूल कनेक्ट 2.0 अभियान राबवण्यात आले. या अभियानाअंतर्गत नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालयातील नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले गेले. कार्यशाळेत महाविद्यालयातील रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ दिपक किनगे यांनी मार्गदर्शन केले.
आपल्या सादरीकरणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020चा परिचय आणि त्यातील शिक्षण पध्दतीची रचना (5+3+3+4), विषय निवडीचे स्वातंत्र्य, मुख्य आणि गौण विषयासह पदवी, श्रेयांक पद्धती, अनेक प्रवेश व अनेक निर्गमन पद्धती, कौशल्य, शाश्वत व क्षमता विकास इत्यादी विषयी मार्गदर्शन केले. तसेच शासनाच्या स्वयं, महास्वयम, साथी आणि विद्यालक्ष्मी योजनेविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ गौरी राणे यांच्या मार्गदर्शनात उपप्राचार्य डॉ. प्रमोद तायडे, तकदिस शेख , गणेश सुपे, भावेश तायडे यांनी प्रयत्न केलेत. कार्यक्रमास नं वा विद्यालयातील पर्यवेक्षक श्रीमती एस एम राणे, श्री एम व्ही झोपे, श्री व्ही बी महाजन, श्री एच एच चौधरी, सौ जोस्ना भंगाळे इत्यादी शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम