
तरूणीसोबत अश्लील चाळे करत विनयभंग
अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अमळनेर प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात १४ मार्च रोजी रात्री ८ वाजता १८ वर्षीय तरूणीसोबत अश्लील चाळे करत तिचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. याशिवाय, तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली.
अमळनेर तालुक्यातील एका गावात आपल्या कुटुंबासह राहणारी १८ वर्षीय तरूणी रात्री पायी जात असताना गावातील दिपक वना मालचे याने तिचा हात पकडून अश्लील चाळे केले आणि तिचा विनयभंग केला. यानंतर, पीडित तरूणीने या वर्तमनाची नोंद घेवून दिपकच्या घरी जाऊन त्याला जाब विचारला. त्यावेळी दिपकसह संगिता वना मालचे आणि वना रामा मालेचे यांनी तरूणीला शिवीगाळ केली आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली.
तरूणीने त्वरित अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, आणि तिच्या तक्रारीवरून दिपक वना मालचे, संगिता वना मालचे आणि वना रामा मालेचे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संदीश पाटील हे करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम