
तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू
वरखेडीतील दुर्दैवी घटना; नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात शोककळा
तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू
वरखेडीतील दुर्दैवी घटना; नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात शोककळा
पाचोरा │
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे दि. २६ सप्टेंबर रोजी दुपारी घडलेल्या दुर्घटनेत धनराज सुभाष सुतार (वय ३५) या तरुणाचा मृत्यू झाला. राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर काम करताना अचानक पाय घसरून खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.
विशेष म्हणजे, हा अपघात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आईसमोरच घडल्याने वातावरण अधिकच हळहळजनक झाले. मृतक धनराज सुतार हा उत्कृष्ट कारागीर म्हणून परिसरात प्रसिद्ध होता. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली आणि दोन मोठे भाऊ असा मोठा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या घटनेमुळे वरखेडी आणि पंचक्रोशीत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम