तीन शिक्षकांची राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी साठी निवड

बातमी शेअर करा...

बातमीदार |दि २४ डिसेंबर २०२३

जळगाव येथील डॉ..संगिता महाजन (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव), कलाशिक्षक सुनिल दाभाडे (मानव सेवा विद्यालय, जळगाव), कलाशिक्षक प्रा.आर एस पाटील (शिक्षणशास्र विद्यालय जळगाव)या तिघांची राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली व शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ” 50 वी राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी 2023″साठी निवड झाली आहे.

या प्रदर्शनीमध्ये वारली पेटिंग चित्र लावली जाणार आहे. हे प्रदर्शन 26 ते 30 डिसेंबर 2023 पर्यत श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल, पुणे येथे होणार आहे.

डॉ..संगिता महाजन , आदर्श कलाशिक्षक सुनिल दाभाडे, कलाशिक्षक प्रा.आर.एस.पाटील यांची निवड झाल्याबद्दल डायट चे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, डॉ. सी.डी.साळुंखे, डॉ.भावसार मॅडम, डॉ.कविता बोरसे, मानव सेवा मंडळ अध्यक्ष डॉ.आर.एस.डाकलिया, सचिव विश्वनाथ जोशी

सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच प्राथमिक मुख्याध्यापिका माया अंबटकर, माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील ,शिक्षणशास्र विद्यालयाचे संस्था अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, प्राचार्य सोनवणे मॅडम तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन चा वर्षाव केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम